Dhanshri Shintre
इन्फिनिक्सने भारतात हॉट ६०आय ५जी स्मार्टफोन सादर केला असून ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे.
हॉट ६०आय ५जी मध्ये ६.७५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून १२०Hz रिफ्रेश रेट आणि ६७० निट्स ब्राइटनेस आहे.
हा डिस्प्ले गेमिंग व स्क्रोलिंगसाठी स्मूथ अनुभव देतो तसेच दिवसाच्या उजेडातही स्पष्ट आणि तेजस्वी दृश्य सुनिश्चित करतो.
या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला असून सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Infinix Hot 60i मध्ये Dimensity 6400 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून हा Android 15 आधारित HiOS 15 इंटरफेसवर कार्य करतो.
हा स्मार्टफोन ६०००mAh क्षमतेची बॅटरी आणि १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे, ज्यामुळे दीर्घकाळ वापर शक्य होतो.
कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची बॅटरी १२८ तासांपर्यंत संगीत प्लेबॅकला चालू ठेवण्याची क्षमता देते.
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लाँच झालेला Infinix Hot 60i किंमत ९,२९९ रुपये, ४ जीबी व्हर्च्युअल रॅमसह उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये AI Extender, Circle to Search आणि AI Eraser सारखे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर्स दिले आहेत.
ड्युअल डिझाइनसह हा फोन IP64 रेटिंग आणि TUV प्रमाणित असून, कंपनीच्या माहितीनुसार ५ वर्षे सुरळीत कामगिरी देतो.