Manasvi Choudhary
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे संपूर्ण राज्यभर लोकप्रिय आहेत. इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य करतात.
इंदुरीकर महाराज यांचे किर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. त्याच्या किर्तनाचे असंख्य चाहते आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.
हल्लीच इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा झाला आहे यामध्ये परिवाराचा फोटो व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांच्या कुटुंबात नेमकं कोण कोण आहे? अशी चर्चा सुरू आहे.
इंदुरीकर महाराज आणि शालिनी या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी आणि मुलाचे नाव कृष्णा आहे.
अहिल्यागर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्याचे गाव आहे.