Siddhi Hande
नेहमीचे पोहे खाऊन अनेकांना कंटाळा आला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही नाश्त्याला इंदौरी पोहे बनवू शकतात.
जाड पोहे, चिरलेला कांदा, जिरवन मसाला, साखर, लिंबाचा रस, कढीपत्ता, मोहरी, हळद, मिरची, शेंगदाणे, तेळ, बारीक शेव, कोथिंबीर
सर्वात आधी तुम्हाला पोहे चाळणीत घेऊन पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.
पोहे मऊ होण्यासाठी त्यात थोडी साखर आणि मीठ टाकून झाकून ठेवा.
यानंतर गरम तेलात मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरचीची फोडणी द्या. त्यात कांदा छान परतवून घ्या.
यानंतर फोडणीत हळद टाका. यानंतर भिजवलेले पोहे टाकून मिक्स करुन घ्या. यावर झाकण ठेवून वाफ काढा.
यानंतर गॅस बंद करुन त्यावर लिंबू टाका. इंदौरी स्पेशल जिरवन मसाला टाकायला विसरु नका.
यानंतर पोह्यांवर बारीक शेव, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे टाकून सर्व्ह करा.
Next: हॉटेलसारखा मिनी समोसा बनवण्याची ही १ ट्रिक वापरा, मुलांच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन