Dhanshri Shintre
इंदूर म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे सकाळचं खास कॉम्बो, चविष्ट पोहे आणि गोड जलेबी.
इंदूरच्या गल्लीबोळांत असे अनेक स्वादिष्ट पदार्थ आहेत, जे तुमच्या भुकेसह मनालाही तृप्त करतील आणि खुश ठेवतील.
चला मग, पाहूया पोह्याशिवाय इंदूरला स्वादांची राजधानी ठरवणारे टॉप ५ अप्रतिम स्ट्रीट फूड्स कोणते आहेत.
इंदूरमध्ये दही वडा खास आहे, कारण येथे मिळतो गोड-आंबट दही, झणझणीत चटणी आणि मसाल्यांचा जबरदस्त संगम.
खमंग बाह्यावरण आणि नारळ-मसाल्यांनी भरलेली खोबरं पॅटीज इंदूरमधील एक हटके आणि चविष्ट स्ट्रीट फूड आहे.
थंडीत गरमागरम गरडूला चिंचेच्या गोड-आंबट चटणीची साथ लाभते, त्याची बटाट्यासारखी चव खरंच विसरता येत नाही.
इंदूरचा सराफा बाजार रात्री चविष्ट पदार्थांनी फुलतो, जिथे मालपुआपासून रबडी-जलेबीपर्यंत अनेक स्वादिष्ट खवय्यांचे पर्याय मिळतात.
इंदूरमधील ५६ दुकान हे खाद्यप्रेमींचे स्वर्ग असून येथे छोले टिक्कीपासून कुल्फीपर्यंत सर्व स्वाद एकाच ठिकाणी मिळतात.