Shreya Maskar
पारंपरिक आणि वेस्टर्न साडीला युनिक स्टायलिश लूक द्यायचा असेल तर, इंडो-वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाउज परिधान करा. चारचौघात तुम्हीच उठून दिसाल.
इंडो - वेस्टर्न ब्लाऊजमध्ये कॉलर पॅटर्न असते. तसेच गळ्याला आणि हाताला फ्रिल असतात. यात आजकाल प्रसिद्ध असलेली ऑफ शोल्डर पॅटर्न देखील आहे.
इंडो-वेस्टर्न ब्लाउजमध्ये शर्ट-स्टाईल कॉलर, हॉल्टर नेक, की-होल कट, बोट नेक आणि लेयरिंग यांचा समावेश होतो. साडी किंवा लेहेंगासोबत हे ब्लाउज सुंदर दिसतात. पारंपरिक लूकला एक नवीन आणि स्टायलिश फ्यूजन टच मिळतो.
इंडो - वेस्टर्न ब्लाउज पॅटर्नमध्ये जॅकेट ब्लाउज हा एक भन्नाट प्रकार आहे. यात साडीला सूट होणारे जॅकेट तुम्ही घाला. यामुळे तुम्ही रुबाबदार दिसाल.
शर्ट सारखे दिसणारे इंडो - वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाउज घालून एक बॉसी लूक तयार होईल. ज्यात तुम्ही खूपच कमाल दिसाल. याच्या अनेक व्हारायटी पाहायला मिळतात.
इंडो-वेस्टर्न फॅशनमध्ये ओव्हरलॅप ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहेत, जिथे ब्लाउजचा पुढचा भाग एका बाजूने दुसऱ्या बाजूवर 'ओव्हरलॅप' केला जातो.
लेअरिंग ब्लाऊज हा देखील इंडो वेस्टर्नमधील एक लोकप्रिय प्रकार आहे. हे सर्व फॅशनेबल ब्लाउज तुम्हाला ऑनलाइन मिळतील. यात अनेक रंग आणि पॅटर्न आहेत.
तुम्हाला थोडे सिंपल आणि सुंदर दिसायचे असेल तर नेट पॅटर्न ब्लाउज घाला. तसेच बंद गळ्याचे इंडो-वेस्टर्न ब्लाउजही सुंदर दिसतील.