Chetan Bodke
जर आपल्याला परदेशामध्ये फिरायचे असेल तर व्हिसा लागतोच.
पण आज आम्ही तुम्हाला असे काही देश सांगणार आहोत, ज्या देशामध्ये तुम्ही व्हिसाच्या ऐवजी फिरू शकणार आहेत.
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात कॅरिबियन बेटांवर बार्बाडोस हा देश आहे. या देशात तुम्ही विना व्हिसाचे ९० दिवस फिरू शकतात.
भूतान देशात फिरताना भारतीयांना व्हिसाची गरज नाही. पण इथे फिरताना भारतीयांना आपले ओळखपत्र वैध असते. या देशात कमी बजेटमध्ये सुट्टी एन्जॉय करू शकता.
सोबतच इंडोनेशिया देशातही भारतीयांना व्हिसाची गरज नाही. या देशामध्ये भारतीय ३० दिवस विना व्हिसाचे फिरू शकतात.
मॉरिशस देशात भारतीय विना व्हिसाचे ९० दिवस फिरू शकतात. हा देश फिरण्यासाठी काही प्रमाणात महागडा आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्येही तुम्ही विना व्हिसाचे फिरू शकता. नेपाळमध्ये विना व्हिसाचे तुम्ही एक महिना फिरू शकता.
कॅरिबियन देशांमधील हैतीमध्येही तु्म्ही विना व्हिसाचे फिरू शकता. या देशामध्ये भारतीयांना फ्री व्हिसा एंट्री आहे, पण तुम्हाला विमानतळावर पर्यटक शुल्क भरावे लागेल.