Chetan Bodke
वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण वजन वाढवण्यासाठी आपल्याला बरीच तारेवरची कसरत करायला लागते.
वजन कमी करण्यासाठी आपण जसा डाएट फॉलो करतो, त्याचप्रमाणे वजन वाढवण्यासाठीही डाएट आहे.
जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला आहारात वाढ करावी लागेल. सोबत जास्त कॅलरीज असलेले पदार्थांचा समावेश करावा.
दिवसातून ५ ते ६ वेळा थोडंथोडं खावे. असे केल्याने तुम्हाला अधिकाधिक भूक लागण्यास सुरुवात होईल.
वजन वाढवण्यासाठी दररोज दूध प्यावे. दिवसाला किमान २ वेळा तरीही दूध प्यावे.
दररोज केळी खाल्ल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. वजन वाढवण्यासाठी दिवसाला ३ ते ४ केळी खाणे आवश्यक आहे.
वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करावा. बटाटा खाल्ल्यामुळे भूक जास्त लागते.
मुख्य बाब म्हणजे, बटाटा खाल्ल्यानंतर शक्य तितके पाणी प्यावे. वजन वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही ओट्स किंवा ओटमील खाऊ शकता. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.
ओट्समध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा सर्वाधिक समावेश असतो. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि वजन वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.