Shruti Kadam
14 फेब्रुवारी 2019 रोजी CRPF जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. यात 40 जवान शहीद झाले. हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्वीकारली.
18 सप्टेंबर 2016 रोजी उरीतील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 19 जवान शहीद झाले. यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला.
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोट केले. 166 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जखमी झाले.
29 ऑक्टोबर 2005 रोजी दिल्लीमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाले, ज्यात 60 पेक्षा अधिक लोक ठार झाले आणि 200 हून अधिक जखमी झाले.
25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबादमधील लुंबिनी पार्क आणि गोकुल चाट येथे दोन स्फोट झाले. यामध्ये 40 लोक ठार झाले.
24 सप्टेंबर 2002 रोजी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 30 लोक ठार झाले आणि 80 पेक्षा अधिक जखमी झाले.
1 ऑक्टोबर 2001 रोजी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या इमारतीवर आत्मघातकी हल्ला झाला. यामध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला.