Rohini Gudaghe
आपल्या सुरेल आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण करणारी गायिका श्रेया घोषालने सर्वांवर जादु केलीय.
श्रेयाने केवळ हिंदीच नाही तर कन्नड, मराठी, तेलुगू, तामिळ, बंगाली आणि पंजाबी चित्रपटांत देखील गाणी गायली आहेत.
श्रेयाच्या नावावर ६ फिल्मफेअर पुरस्कारही आहेत.
श्रेया घोषालचा जन्म पश्चिम बंगालमधे, तर बालपण राजस्थानमधील रावतभाटा येथे गेलं.
श्रेयाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती.
श्रेयाची गायनातील पहिली गुरू तिची आई होती.
झी टीव्हीचा रियालिटी शो 'सा रे ग मा पा' जिंकून श्रेयाने तिच्या संगितातील करिअरला सुरूवात केली होती.