Railway Ticket : रेल्वेचं कोणतं तिकीट लगेच होतं कन्फर्म? GNWL, RLWL, PQWL की RAC?

Alisha Khedekar

'ही' तिकिटे लवकर कन्फर्म होतात

भारतीय रेल्वेने प्रवास करताना तिकीट कन्फर्मेशन करण्यासाठी योग्य कोटा निवडणे आवश्यक असते. चला पाहूया कोणती तिकिटे सर्वात आधी कन्फर्म होतात

Railway Ticket Confirmation | Saam tv

GNWL सर्वात फायदेशीर

जीएनडब्ल्यूएल (General Waiting List) तिकिटे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी असतात आणि कन्फर्मेशनची शक्यता सर्वाधिक म्हणजे ८० ते ९० टक्के असते, त्यामुळे प्राधान्य द्यावे

Indian Railway General Waiting List Ticket | Saam Tv

RLWL मध्यम शक्यता

आरएलडब्ल्यूएल (Remote Location Waiting List) तिकिटे मधल्या स्थानकांवरून प्रवासासाठी असतात. यामध्ये कन्फर्मेशनची शक्यता ४० ते ६० टक्के असते, जी GNWL पेक्षा कमी असते.

Railway Remote Location Waiting List Ticket | Saam tv

PQWL कमी प्राधान्य

PQWL ( Pooled Quota Waiting List) तिकिटे कमी अंतराच्या प्रवासासाठी असतात. या प्रकारात कन्फर्म होण्याची शक्यता कमी म्हणजे २० ते ३० टक्केच असते

Indian Railway Pooled Quota Waiting List ticket | Saam Tv

RSWL सर्वात कमी

RSWL (Roadside Station Waiting List) तिकिटे सुरुवातीच्या स्थानकाजवळील प्रवाशांसाठी असतात. यात कन्फर्मेशनची शक्यता खूपच कमी म्हणजे १० ते २० टक्के असते.

Indian Railway Roadside Station Waiting List Ticket | Saam tv

TQWL धोकादायक पर्याय

TQWL (Tatkal Quota Waitlist) तिकिटे तत्काळ बुकिंगसाठी असतात. या तिकिटांचे कन्फर्मेशन जवळजवळ अशक्य असून शक्यता फक्त ० ते १० टक्के असते.

Indian Railway Tatkal Quota Waitlist Ticket | Saam Tv

RAC प्रवासाची हमी

RAC (Reservation Against Cancellation) तिकिट कन्फर्म होत नाही, पण प्रवास करता येतो. सुरुवातीला सीट शेअर करावी लागते, नंतर पूर्ण सीट मिळण्याची शक्यता असते.

Indian Railway Reservation Against Cancellation ticket | Saam tv

सणासुदीत गर्दी

सण आणि सुट्ट्यांच्या काळात प्रतीक्षा यादी वेगाने वाढते. त्यामुळे योग्य कोटा निवडणे आणि लवकर बुकिंग करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Indian Railway Ticket Confirmation | Saam tv

योग्य कोटा निवडा

तिकीट बुक करताना योग्य कोटा निवडल्यास कन्फर्मेशनची शक्यता वाढते. चुकीचा कोटा निवडल्यास तिकीट मिळणे कठीण होऊ शकते.

Indian Railway Choose The Right Quota For Ticket | Saam Tv

NEXT : परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Mithila Palkar
Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग