ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रेल्वेने प्रवास करताना, प्रवाशांना रेल्वेने बनवलेल्या नियमांचे पालन करण्यात सांगितले जाते. परंतु, काही प्रवासी या नियमांचे पालन करतात कर काही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करतात.
रेल्वेच्या नियमानुसार ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही कोणताही पाळीव प्राणी सोबत घेऊन जाऊ शकत नाही.
ट्रेनमधून प्रवास करताना विस्फोटक पदार्थ जसे की, सिलिंडर, लायटर सारख्या वस्तू नेण्यास बंदी आहे.
तुम्ही रेल्वे स्थानकावर अनेक फळविक्रेत्यांना विविध फळं विकताना पाहिले असेल. परंतु प्रवास करताना हे एक फळ नेण्यास बंदी आहे.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही सुकलेले नारळ म्हणजेच खोबरं घेऊन जाऊ शकत नाही. कारण हे फळ ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीमध्ये येते.
रिपोर्टनुसार, सुक्या नारळात म्हणजेच खोबऱ्यात तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे लवकर पेटू शकते.
नियमाच्या विरोधात जाऊन जर तुम्ही खोबरं घेऊन जात असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.