Shreya Maskar
'इंडियन आयडल 12' फेम गायिका सायली कांबळेने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिने सोशल मीडियावरवर खास पोस्ट शेअर केली आहे.
सायली कांबळे लवकरच आई होणार आहे. एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
सायलीचे नुकतेच डोहाळे जेवणाचा सोहळा थाटामाटात पार पडला आहे. याचे सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.
सायलीने 2022ला प्रियकर धवलबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनी दोघे आई-बाबा होणार आहेत.
सायलीने आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तिला 'इंडियन आयडल 12' मुळे खूप लोकप्रियता मिळाली.
सायलीचे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने डोहाळे जेवण पार पडले आहे.
सायलीने हिरव्या, लाल रंगाची साडी नेसून त्याला मॅचिंग फुलांचे दागिने परिधान केले आहे. सायली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सायलीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते, मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.