Surabhi Jayashree Jagdish
धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट झाला आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या. आता दोघे वेगळे झाले असून धनश्रीला पोटगी देण्याच्या बातम्या येतायत.
युझवेंद्र चहल आणि धनश्री यांना कौटुंबिक न्यायालयाकडून किती पोटगी मिळाली? दरम्यान, पोटगीबाबत बातम्या समोर येतायत.
रिपोर्ट्सनुसार, धनश्रीला 60 कोटी रुपयांची पोटगी मिळणार आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
युजवेंद्रने धनश्रीला 60 कोटी रुपये पोटगी दिल्याच्या अफवेला पुष्टी मिळाली तर ती क्रिकेटपटूला चांगलीच महागात पडणार आहे.
क्रिकेटर युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती सुमारे 45 कोटी रुपये आहे. तर कोरिओग्राफर धनश्री वर्माचं नेटवर्थ 25 कोटी रुपये आहे.
घटस्फोटानंतर धनश्रीला 60 कोटी रुपये मिळाले तर तिला सानिया मिर्झापेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.
जेव्हा सानिया मिर्झाने शोएबपासून घटस्फोट घेतला तेव्हा मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या बदल्यात तिला काहीच पैसे मिळाले नव्हते.