Shruti Vilas Kadam
हेझल कीचने लहानपणी 'हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’ ‘हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान’ या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या.
हॉलीवूडसोबत हेझल कीचने बॉलिवूडमध्येही काम केले. तिने काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि ‘Bigg Boss 7’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून दिसली.
हेझल कीच ही भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांची पत्नी आहे. दोघांचे लग्न २०१६ मध्ये पार पडले. हा विवाह त्या काळात माध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.
विवाहानंतर हेझल कीचने शीख धर्मपरंपरेनुसार ‘गुरबसंत कौर’ हे धार्मिक नाव स्वीकारले. आनंदपूर साहिब गुरुद्वारामधील विधी दरम्यान तिला हे नाव देण्यात आले.
हेझल कीच आणि युवराज सिंग यांना दोन मुले आहेत. त्यांचा पहिला मुलगा २०२२ मध्ये झाला. दुसरी मुलगी २०२३ मध्ये झाली. दोघेही आपल्या मुलांसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अभिनय आणि मॉडलिंगनंतर हेझल कीच आता मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करत आहे. ती सायकॉथेरपिस्ट होण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत असून, लोकांच्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करण्याचा तिचा मानस आहे.
युवराज सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की हेझल कीचने होकार देण्याआधी ३–४ वर्षे त्याला भेटायलाही तयार नव्हती. युवराजने सातत्य, संयम आणि जिद्द ठेवून तिचे मन जिंकले.