ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिमाचल प्रदेशात भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्यापैकी सोलन हिल स्टेशन हे पर्यटकांना खूपच आकर्षित करते.
सोलन जवळच आणखी एक स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन वसलंय ते म्हणजे चैल हिल स्टेशन.
चैल हिल स्टेशन पाहून तुम्ही या जागेच्या प्रेमात पडाल. येथील नैसर्गिक सुंदरता पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात.
येथे धुक्यांनी वाढलेले डोंगरांमधून खोल दऱ्यांचे सुंदर दृश्ये मनाला भुरळ पाडतात.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी ठिकाण शोधताय तर येथे नक्की भेट द्या.
तुम्ही ट्रेकिंग आणि वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. येथे जगातील सर्वात २४०० मीटर उंचीवर असलेले क्रिकेटचे मैदान आहे. येथे नक्की भेट द्या.
हिमाचलमधील सोलनपासून चैल हिल स्टेशनचे अंतर तर सुमारे 37.9 किमी आहे.