ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज कच्ची केळी खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या.
कच्च्या केळीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, लोह, मॅग्नेशियम, प्रीबायोटिक गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक भरपूर असतात.
कच्च्या केळीमध्ये पोटॅशियमचे जास्त प्रमाणात असतात.निरोगी हृदय राखण्यासाठी, कच्ची केळी खाऊ शकता.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात कच्च्या केळ्यांचा समावेश करावा. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर मानले जाते.
कच्च्या केळीमध्ये भरपूर फायबर असते, जे पोटासाठी फायदेशीर आहे. दररोज केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
कच्ची केळी मर्यादित प्रमाणात खाल्ली पाहिजे. जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.