ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेसाठी दूध हा एक उत्तम पर्याय आहे. दुधाने चेहऱ्यावर मालिश करण्याचे फायदे कोणते, जाणून घ्या.
दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. म्हणून, दररोज दुधाने चेहऱ्याची मालिश केली केल्यास मृत त्वचा काढून टाकण्यास आणि त्वचा सॉफ्ट होण्यास मदत करते.
दुधात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील मुरुमे आणि डाग कमी करण्यास मदत करतात.
नियमित दुधाची मालिश केल्याने चेहरा चमकदार होतो. एकदा नक्की ट्राय करा.
बहुतेक लोक चेहऱ्यावर केमिकलयुक्त प्रोडक्टस वापरतात,याचा त्वचेवर परिणाम होतो. परंतु दूध संवेदनशील त्वचेसाठी देखील प्रभावी आहे.
उन्हाळ्यात दुधाने चेहऱ्याची मालिश केल्याने त्वचेला आराम मिळतो. तसेच उन्हामुळे होणारी त्वचेची जळजळ कमी होते.
दररोज ५-१० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. फक्त ताजे, थंडगार दूध वापरा. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर पॅच टेस्ट करा.