ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण अनेकदा स्मार्टफोनमध्ये बॅक कव्हर वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यामुळे फोनचेही नुकसान होते.
फोन कव्हर वापरल्याने कोणते नुकसान होतात, जाणून घ्या.
फोन कव्हर डिव्हाइसची उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होऊ शकते आणि फोनच्या परफोमन्सवर परिणाम होऊ शकतो.
जास्त घट्ट कव्हर फोनच्या नेटवर्क अँटीनाला ब्लॉक करु शकते, ज्यामुळे फोनमध्ये नेटवर्क समस्या उद्भवू शकतात.
स्मार्टफोन कव्हर वापरल्याने वायरलेस सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या मोबाइल डेटा कनेक्शन आणि कॉलच्या क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो.
प्रीमियम स्मार्टफोन्सचे खरे सौंदर्य कव्हरमागे लपलेले असते, ज्यामुळे त्याचे फील आणि लूक कमी होतो.
मोबाईल कव्हरच्या वापरामुळे पॅनलवर आत धूळ आणि कचरा जमा होऊ शकतो. त्यामुळे फोनची बॉडी खराब होऊ शकते.