ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही पुरुष आणि महिला दोघांमध्येही एक सामान्य त्वचेची समस्या आहे. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.
चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे कोणती, जाणून घ्या.
प्यूबर्टी, गर्भधारणा किंवा मेनोपॉज यासारख्या हार्मोनल बदलांमुळे पिंपल्स येऊ शकतात.
धूळ किंवा प्रदूषणामुळे पिंपल्स येऊ शकतात. तसेच चेहरा नियमितपणे न धुण्यामुळे देखील पिंपल्स येऊ शकतात.
आहारात जास्त साखर, दुग्धजन्य पदार्थ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स होऊ शकतात.
जास्त ताणतणावात राहिल्याने देखील पिंपल्सची समस्या होते. कारण त्यामुळे हार्मोनल बदल होऊ शकतात.
त्वचेची योग्य काळजी न घेणे, जसे की योग्य प्रोडक्टस न वापरणे किंवा जास्त प्रमाणात त्वचा धुणे, यामुळे देखील पिंपल्स येतात.