ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाट्याची साल आपण अनेकदा फेकून देतो. परंतु याचे फायदे कोणते माहितीये का, जाणून घ्या.
बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, नियासिन, फॉलिक अॅसिड, रिबोफ्लेविन, थायामिन आणि पायरीडॉक्सिन सारखे पोषक घटक असतात.
बटाट्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बटाट्याची साले खावीत.
बटाट्याच्या सालीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते, जे तुम्हाला कर्करोगापासून वाचवू शकते. कर्करोग हा एक अतिशय धोकादायक आजार आहे आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बटाट्याच्या सालींचा समावेश करावा. यामध्ये असलेले पोटॅशियम तुमच्या हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
हाडं कमकुवत झाली असेल तर रोजच्या आहारात बटाट्यांच्या सालीचा समावेश करा. यामध्ये कॅल्शियम असते जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात.
बटाट्याच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, फिनोलिक आणि अँटीऑक्सिडंट पोषक घटक असतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.