Maharashtra : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेली 'ही' ७ स्वर्गासारखी सुंदर गावे, सुट्टीत एकदा नक्की फिरून या

Shreya Maskar

वेळास गाव

वेळास गाव हे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लपलेले आहे. हे पर्यावरण-पूरक पर्यटन स्थळ आहे. येथे स्वच्छ किनारे, डोलणारी नारळाची झाडे आणि जवळच ऐतिहासिक बाणकोट किल्ला आहे.

village | google

रतनवाडी गाव

अहिल्यानगर (अहमदनगर) येथे रतनवाडी गाव आहे. भंडारदराजवळ वसलेले हे गाव रतनगड किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी 'बेस कॅम्प' म्हणून काम करते. दगडी घरे आणि खडकाळ भूभागामुळे या गावाचे सौंदर्य वाढते.

Ratanwadi village | google

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे कोकणात रत्नागिरीत आहे. हे गाव प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यावरच वसलेल्या ४०० वर्षे जुन्या 'स्वयंभू गणेश मंदिरा'साठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर नदी, गणपतीच्या आकाराचा डोंगर आणि स्वच्छ निळा अरबी समुद्र यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो.

Ganapatipule | pinterest

आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली गाव वसलेले आहे. धुक्याने वेढलेले, पर्यावरणपूरक आणि वनराईने नटलेले असे हे गाव आहे. प्रचंड पावसामुळे 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाते.

Amboli | google

केळशी गाव

रत्नागिरी जिल्ह्यात केळशी गाव वसलेले आहे. केळशीमध्ये सोनेरी वाळूचे किनारे आहेत. तसेच येथे जुनी मंदिरे देखील पाहायला मिळतील.

Kelshi village | google

राजमाची गाव

पुणे - रायगड सीमेवर राजमाची गाव आहे. हे ठिकाण ऐतिहासिक 'राजमाची किल्ल्या'साठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या गावाला जाणारा मार्ग धबधबे आणि हिरव्यागार दऱ्यांनी नटून एखाद्या नंदनवनासारखा भासतो.

Rajmachi village | google

वाळवंडे गाव

पालघर जिल्ह्यातील वाळवंडे (वळवंडा) हे जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. येथे वारली कला पाहायला मिळते. ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की जा.

Walwande village | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Kalwa Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...