Chetan Bodke
जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक प्रवासी प्रवास करणाऱ्या देशांमध्ये भारतासह सौदी अरेबिया, युके, पाकिस्तान इत्यादी देशांचाही समावेश आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ कोटी १९ लाख भारतीयांनी प्रवास केला आहे.
सौदी अरबच्या ६७ लाख, ब्रिटनच्या ५९ लाख, पाकिस्तानच्या ४२ लाख, अमेरिकेच्या ३६ लाख प्रवाशांनी या विमानतळावरुन प्रवास केला आहे.
आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये या विमानतळावरून ८.६९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता.
दुबई विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाल ग्रिफिथ्स यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.
मागच्या वर्षी या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोरोना काळापूर्वी म्हणजे २०१९ च्या तुलनेमध्ये खूपच जास्त आहे.
२०२३ मध्ये या विमानतळावरुन ८.६९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. तर २०१९ मध्ये हा आकडा ८.६३ कोटी इतका होता.
तर, २०२४ मध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ८८ कोटींहून अधिक प्रवाशी प्रवास करण्याची शक्यता विमानतळ प्रशासनाने वर्तवली आहे.