Chetan Bodke
सध्याच्या धकाधकीचे जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये वेगवेगळ्या आजाराचे प्रमाण वाढले.
सर्वांनाच आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी कोरफडीचा ज्यूस फारच लाभदायी आहे.
कोरफडीच्या ज्यूसचा आहारात समावेश केल्यास अनेक आजारांपासून शरीराला आराम देते.
रोज कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्वचा कोरडी राहत नाही.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करावे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोरफडीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम व्यवस्थित ठेवते.
बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होत असल्यास कोरफडीचा ज्यूस फायदेशीर ठरतो.
शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस प्रभावी आहे. यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.