Surabhi Jayashree Jagdish
आग्र्यामध्ये असलेल्या ताजमहालला ऐतिहासिक वारसा आहे. याच्या सुरक्षेसाठी मोठी फौज तैनात असते.
सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता ताजमहालच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर व्यक्ती आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक वाढवण्यात आलेत.
१९७१ च्या युद्धादरम्यान शत्रूंपासून ताजमहालचं संरक्षण करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली होती हे तुम्हाला माहिती आहे का?
१९७१ च्या युद्धादरम्यान, शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ताजमहाल झाडांच्या फांद्या, गोणपाट आणि ताडपत्रीने झाकण्यात आला होता.
हिरव्या रंगाच्या ज्यूटच्या पिशव्या, दोरी, बांबू, काठ्या आणि माती आणि कचऱ्याने ताजमहाल १५ दिवस पूर्णपणे लपवण्यात आला.
शत्रूच्या विमानांना ताजमहाल जंगलासारखे दिसावा यासाठी तो अशा पद्धतीने झाकण्यात आला होता.
ताजमहाल झाकण्यासाठी तसंच साहित्य खरेदी करण्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी एकूण २०,५०० रुपये खर्च आले.