ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताची ओळख केवळ त्याच्या संस्कृतीनेच नाही तर त्याच्या ऐतिहासिक विकासाने देखील आहे.
भारताची पहिली ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी धावली.
ही ट्रेन मुंबई (बोरी बंदर) आणि ठाणे दरम्यान धावत असे.
ट्रेनने सुमारे ५७ मिनिटांत ३४ किलोमीटरचे अंतर कापले होते.
या ट्रेनमध्ये ३ इंजिन आणि १४ कोच होते. ट्रेनमध्ये एकूण ४०० प्रवासी होते.
तिन्ही इंजिनांची नावे सिंध, सुलतान आणि साहिब अशी होती.
या ट्रेनचा सरासरी वेग ताशी अंदाजे ३५ किलोमीटर होता.
हा पहिला रेल्वे प्रवास आठवणीत राहण्यासाठी, दरवर्षी १६ एप्रिल रोजी "भारतीय रेल्वे दिन" साजरा केला जातो.