Shreya Maskar
तिरंगा पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, तूप, जिरे, टोमॅटो प्युरी, हळद, लाल मिरचीची पेस्ट, मीठ, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, पालक प्युरी इत्यादी साहित्य लागते.
तिरंगा पुलाव बनवण्यासाठी दोन पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे आणि तांदूळ घालून शिजवून घ्या.
मिश्रणात आल्याची पेस्ट, मीठ आणि पाणी टाकून उकळून घ्या.
यातील एका पॅनमध्ये हिरवी मिरची पेस्ट, पालक प्युरी टाकून मिक्स करा.
दुसऱ्या पॅनमध्ये टोमॅटो प्युरी, लाल तिखट घालून मिक्स करा.
आता भात शिजल्यावर ताटामध्ये सजवताना आधी केशरी भात, त्यानंतर पांढरा भात आणि मग शेवटी हिरवा भात असे लेअर लावून घ्या.
अशाप्रकारे खमंग तिरंगा पुलाव तयार झाला आहे.
तुम्ही तिरंगा पुलावमध्ये ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.