Manasvi Choudhary
स्वातंत्र्यदिनी तुम्हालाही नाश्त्यामध्ये तिरंग्याच्या रंगाची झलक पाहायची आहे तर तुम्ही असे काही पदार्थ बनवा जे चवदार आणि आकर्षक असतील.
ब्रेडच्या एका स्लाइसवर हिरवी पुदीना - कोथिंबीर चटणी लावा.
दुसऱ्या स्लाईसवर चिज- मेयोनिजचा पांढरा लेयर करा.
तिसऱ्या स्लाईसवर गाजर किंवा टोमॅटोचा स्प्रेड लावा.
तिन्ही स्लाईस एकत्र ठेवून त्रिकोणी आकारामध्ये कापा. तिरंगा सँडविच तयार होईल.
इडलीचे पीठ तीन भागांमध्ये स्प्रेड करा. एका भागात पालक प्युरी आणि पीठ ठेवा. दुसऱ्या भागात साधे पीठ ठेवा. आणि तिसऱ्या भागामध्ये गाजर पेस्ट आणि पीठ ठेवा. म्हणजे घरच्या घरी हेल्दी तिरंगा इडली तयार होईल.
तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी कोथिंबीर- पुदीन्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट आणि पांढरे बॅटर ठेवून वाफवून घ्याय
भाताचे देखील तुम्ही तीन भाग करायचे आहेत. सर्वातआधी भातामध्ये पालक पेस्ट मिक्स करा. नंतर दुसरा भाग तसाच ठेवा. तिसऱ्या भागामध्ये गाजरची पेस्ट मिक्स करा. अशाप्रकारे तीन स्टेपमध्ये तुमचा तिरंगा पुलाव तयार होईल.
एका ताटामध्ये किवी किंवा हिरवी द्राक्षे, केळी, लिची, संत्रे आणि आंबा तिरंगाच्या क्रमाने कापून लावा. त्यावर थोडे मध आणि चाट मसाला मिक्स करा.
ग्लासमध्ये सुरूवातीला संत्र्याचा रस ओता त्यानंतर नारळाचे दूध आणि त्यानंतर पुदीना ड्रिंकने तुम्ही मॉकटेल्स सजवा.