ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपण कमी पाणी पितो. कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊन शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात.
शरीराला आवश्यक पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरुन डिहायड्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होईल.
कॅाफी, चहा आणि सूप सारख्या गरम पेयांचे सेवन केले पाहिजे.
टरबूज, संत्री, काकडी, डाळिंब सारख्या फळांचा आहारात समावेश केले पाहिजे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
रोज सकाळी नारळ पाणी प्या. यामध्ये असलेले व्हिटॅमिनस आणि मिनरल्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
आहारत कमी मीठाचे सेवन करा. अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्यास डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते
केळीमध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होते.
थंडीत आपली त्वचा ड्राय म्हणजेच कोरडी पडते. त्यामुळे त्वचेवर दररोज मॉइश्चरायझर लावावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात आलं आणि लिंबाचं पाणी प्यायल्यास 'या' समस्या होतील दूर