ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा असो कि हिवाळा डास प्रत्येक ऋतुमध्ये चावतात. विशेषतः पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाणीमुळे डासांचे प्रमाण वाढते.
डास चावल्याने डेंगू, मलेरिया सारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
डास जेव्हा चावतात तेव्हा ते मनुष्याचे रक्त शोषून घेतात. डास चावल्यानंतर खाज सुटते आणि आग होऊन त्या जागी गाठ तयार होते.
पण तुम्हाला माहिती आहे का, कोणत्या रक्तगटातील लोकांना सर्वाधिक डास चावतात.
डास हे सर्वात जास्त O रक्तगटातील लोकांना चावतात.
माहितीनुसार, या रक्तगटातील लोकांचा मेटाबॅालिक रेट जास्त असतो. त्यामुळे ते सर्वात जास्त O रक्तगटातील लोकांना चावतात.
O रक्तगटातील व्यक्तींच्या रक्तात तयार होणारे प्रोटीन आणि रासायनिक पदार्थ डासांना जास्त आकर्षित करतात.
मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींनाही डास जास्त चावतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी