ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीमध्ये फायबर, पोटॅशियम , मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ , आयरन, कॅापर आणि अँटीऑक्सिडंटस असतात.
केळी हे पोषक तत्वाने भरपूर असले तरी हिवाळ्यात केळी खावी का हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया.
केळीमध्ये कार्बेाहायड्रेटसचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्यास शरीराला दिवसभरासाठी उर्जा मिळते.
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
केळीमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत करण्यास मदत करतात.
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी केळी खावे. यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास केळीचा डाएटमध्ये समावेश करावा. केळी खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते.
रात्रीच्या वेळीस केळी खाणं टाळा. दातांचा किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर केळी खाणं टाळा. अन्यथा हा त्रास अधिक वाढू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: 'हे' फळ खाल्ल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम