ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अवाकाडो एक पौष्टीक फळ असून यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक,पोटॅशियम, आणि आयरन सारखे पोषक तत्व असतात.
पोषक तत्वाने परिपूर्ण असलेले हे फळ काही लोकांसाठी मात्र हानिकारक ठरु शकतं.
ज्यांना अपचनाचा त्रास आहे किंवा पोटाचे विकार आहे त्यांनी अवोकाडो खाणं टाळावं अन्यथा अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.
जर तुम्ही वजन कमी करत असाल तर डाएटमध्ये अवोकाडोचा समावेश करु नका यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन वाढते.
मायग्रेनची समस्या असल्यास उलटी आणि मळमळचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असल्यास अवोकाडो खाऊ नये.
अवाकाडोचे सेवन केल्यास खाज सुटणे, सूज येणे,आणि त्वचेवर चट्टे येणे यासारखी एलर्जी होऊ शकते.
गर्भवती महिलांनी केवळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच अवोकाडोचा आहारात समावेश करावा. अन्यथा पचनाशी संबधित समस्या होऊ शकते.
किडनीचा त्रास असल्यास अवाकाडोचे सेवन करु नये यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे त्रास अधिक वाढू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रिकाम्या पोटी पपई खाणं आरोग्यासाठी ठरेल वरदान; जाणून घ्या 'हे' ६ फायदे