Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन संस्कृतीत अनेक भाज्यांमध्ये तसेच डाळींमध्ये फोडणीला मोहरी हा मसाला वापरतात.
फोडणीमध्ये मोहरी घातल्याने पदार्थाला चव येते. तिचा तिखट आणि उग्र वास या भांज्याच्या चवीवर परिणाम करतात.
मात्र प्रत्येक भाजीचा स्वभाव लक्षात घेऊन कोणत्या भाजींमध्ये मोहरीचा वापर करू नये हे जाणून घ्या.
खीर, शीरा किंवा लाडूचे अनेक प्रकार यासांरख्या गोड पदार्थामध्ये मोहरीचा वापर करू नये.
शाही पनीर, मटर पनीर यासांरख्या गरम मसाला, टोमॅटो- काद्यांची ग्रेव्ही असलेल्या भाज्यांमध्ये मोहरी चुकूनही टाकू नये.
मेथी, पालक, शेपू यासांरख्या पालेभाज्यांमध्ये मोहरीचा वापर करणे टाळावे यामुळे भाज्यांची चव बिघडू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.