ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएल २०२५चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे आयोजित करण्यात आला. या मेगा लिलावात अनेक रेकॅार्डब्रेक बोली लावण्यात आली.
आयपीएल मेगा लिलावात सर्वांचे लक्ष ऋषभ पंतवर होते. २७ कोटींची सर्वात मोठी बोली लावत लखनऊ सुपरजायंटसने त्याला आपल्या संघात घेतले. तो आयपीएल इतिहासातला सर्वात महाग खेळाडू ठरला.
कोलकाताला आयपीएलचा चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची मोठी बोली लावत पंजाब किंग्सने आपल्या संघात घेतले.
कोलकाता संघाने सर्वांना आश्चर्यचकित करत वेंकटेश अय्यरला २३.३७ कोटींमध्ये विकत घेतले.
फिरकीपटू युझवेंद्र चहल यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघातून खेळताना दिसणार आहे. पंजाबने १८ कोटीं मोजत चहलला संघात घेतले.
गेल्या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणारा जोस बटलर यंदा गुजरात टायटन्सच्या संघातून खेळणार आहे. लिलावात गुजरातने १५.७५ कोटींमध्ये विकत घेतले.
दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी खर्च करत केएल राहुलला आपल्या संघामध्ये घेतले.
या लिलावात पंजाब किंग्सने सर्वात पहिली बोली अर्शदीप सिंहवर लावली. अर्शदीपवर १८ कोटी मोजत पंजाबने पुन्हा एकदा संघात घेतले.
NEXT: रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे 'हे' जबरदस्त फायदे; तुम्हाला माहिती आहेत का?