Dhanshri Shintre
पूर्वी गावातील शाळांमध्ये मुले वर्ग स्वच्छ करत; आजही जपानमध्ये ही परंपरा जपली जाते. विद्यार्थी स्वतः शाळा स्वच्छ ठेवतात.
जपानमध्ये विद्यार्थी केवळ वर्गच नाही, तर शौचालयेही स्वच्छ करतात. त्यामागील कारण ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.
जपानमधील शाळांमध्ये शिस्तबद्धतेसाठी ‘टोबान कात्सुडो’ नावाची कर्तव्य प्रणाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात.
जपानी संस्कृतीत, विशेषतः शिंटो धर्मात, स्वच्छतेला केवळ शारीरिक नव्हे तर नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेची कामे दिल्यास त्यांच्यात जबाबदारीची भावना वाढते, नैतिक मूल्ये विकसित होतात आणि ते उत्तम नागरिक बनण्याच्या मार्गावर वाटचाल करतात.
मीडिया रिपोर्टनुसार, काही जपानी शाळांमध्ये सफाई कर्मचारी नसतात; शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र शाळा स्वच्छ करतात, यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य वाढते.
स्वच्छतेच्या माध्यमातून विद्यार्थी वेळेचे नियोजन, सहकार्य, शिस्त आणि चिकाटी शिकतात. लहान कामांतून ते मेहनतीचे महत्त्व आणि प्रतिष्ठेची खरी जाणीव घेतात.
शाळेत मिळालेल्या सवयी आयुष्यभर उपयोगी पडतात; या पद्धतीमुळे विद्यार्थी सामायिक जागांचा सन्मान, समूहातील जबाबदारी आणि स्वच्छतेचा गर्व शिकतात.
अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतली जाते कारण त्यामागे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे – यातून ते अनेक सकारात्मक गुण आत्मसात करतात.