Shreya Maskar
सूर्याची किरणे सर्वात आधी भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर पडतात. 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये सूर्य सर्वात आधी उगवतो.
अरुणाचल प्रदेशातील डोंग येथे सूर्याची किरणे सर्वात आधी पडतात.
डोंग येथे सूर्योदय पहाटे 4 वाजता होतो. त्यामुळे निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी येथे पर्यटक गर्दी करतात.
डोंग हे अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील पूर्वेकडील गाव असून 1240 मीटर उंचीवर आहे.
भारत, म्यानमार आणि चीन या तीन देशांच्या त्रिकोणी संगमावर स्थित डांग येथे ट्रेकिंगद्वारे सहज पोहोचता येते.
अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी तुम्ही दिल्ली, कोलकाता किंवा गुवाहाटीहून विमानाने जाऊ शकता.
अरुणाचल प्रदेशला गेल्यावर वालोंग येथे जा. वालोंग ते डोंग व्हॅलीला तुम्ही ट्रेकिंग करत जाऊ शकता.
सूर्योदयासोबत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव तुम्हाला येथे घेता येईल.