ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीनचे मुख्य कार्य स्नायु तयार करणं आहे. तसेच प्रोटीन हे एक अस पोषक तत्व आहे जे शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे.
शरीरात स्नांयूची योग्य वाढ, लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि मेटाबॅालिजम वाढवण्यासाठी प्रोटीन गरजेचे आहे. तसेच प्रोटीनचा उपयोग अमिनो अॅसिड तयार करण्यासाठी केला जातो.
शरीरात प्रोटीनची कमतरताअसल्यास सतत थकवा, कमजोरी आणि केस गळणे सारखी समस्या उद्भवतात.
एका व्यक्तीला एका दिवसात किती प्रोटीनची गरज आहे हे त्या व्यक्तीचे वय, लिंग आणि वजनेवर अवलंबून असते.
एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात ०.८ ते १.२ ग्रॅम प्रतिकिलोसाठी आवश्यक असते. म्हणजेच एका व्यक्तीचे वजन ७० किलो आहे तर त्या व्यक्तीला ५० ते ७० ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता आहे.
जर तुम्ही अॅथलीट असाल तर तुम्हाला अधिक प्रोटीनची गरज आहे. म्हणजेच प्रतिकिलोसाठी १.६ ते २.२ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता आहे.
सोयाबीन, अंडे, ड्राय फ्रुट्स, बीन्स आणि बिया यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
जर तुम्ही फास्ट फूड अधिक प्रमाणात खात असाल तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: क्रिकेटर मोहम्मद सिराजचं नेटवर्थ किती?