किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Manasvi Choudhary

तळलेले तेल वारंवार गरम करणे

एखादा पदार्थ तळल्यानंतर उरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात ट्रान्स फॅट्स आणि फ्रि रॅडिकल्स तयार होतात. यामुळे ॲसिडिटी, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

Reheating Cooking Oil | Google

भाज्या कापल्यानंतर धुणे

भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन बी आणि सी निघून जातात. त्यामुळे भाज्या नेहमी कापण्यापूर्वी अखंड स्वरूपात स्वच्छ धुवाव्यात.

Washing Vegetables After Cutting

गरम अन्न थेट प्लास्टिकच्या डब्यात ठेवणे

वाफाळते गरम अन्न किंवा वरण थेट प्लास्टिकच्या डब्यात भरल्याने प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळू शकतात, ज्यामुळे पचनसंस्थेला आणि आरोग्याला मोठा त्रास होऊ शकतो.

Storing Hot Food in Plastic | Saam Tv

ओले चॉपिंग बोर्ड आणि लाकडी चमचे तसेच ठेवणे

भाजी वा मटण कापल्यानंतर चॉपिंग बोर्ड आणि वापरलेले लाकडी चमचे ओलेच ठेवल्यास त्यावर बुरशी आणि घातक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. वापरानंतर ते नेहमी स्वच्छ धुवून कोरडे करावेत.

Leaving Chopping Board Wet | pintrest

अति उष्णतेवर नॉन-स्टिक पॅन वापरणे

नॉन-स्टिक भांड्यांवर टेफ्लॉनचा थर असतो. रिकामे भांडे तीव्र आचेवर गॅसवर ठेवल्यास हा थर खराब होऊन विषारी वायू तयार होऊ शकतो. नॉन-स्टिक भांडी नेहमी मंद आचेवर वापरावीत.

Using Non-Stick Pans on High Heat | GOOGLE

गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवून देणे

वाफ निघणारे गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजचे आतील तापमान बिघडते, ज्यामुळे इतर अन्नपदार्थ खराब होण्याचा आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. अन्न पूर्ण थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवावे.

Putting Hot Food Directly in Fridge | PINTREST

सर्व पदार्थांसाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरणे

भाजी, फळे आणि नॉन-व्हेज (मांसाहारी पदार्थ) यासाठी एकच चॉपिंग बोर्ड वापरल्यास अन्नातून संसर्ग होण्याचा धोका कैक पटीने वाढतो

Using Single Chopping Board for All

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

Kidney Failure Risk
येथे क्लिक करा...