ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिना सुरु होताच महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते.
हिंदूधर्मात श्रावण महिन्याला आणि उपवासाला विशेष महत्त्व दिलं गेले आहे.
श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करण्याचे काही खास शास्त्रीय नियम आहेत चला जाणून घेऊया.
श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता.
श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. रुद्राक्ष धारण करण्यासाठी पहाटेचा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वप्रथम रुद्राक्ष गंगाजलाने धुवावे. आणि त्यानंतर ओम नमः शिवाय असा जप करत ते धारण करावे.
रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याची दररोज नियमित पूजा करावी त्यामुळे महादेवाची कृपा तुमच्यावर रहाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.