ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू पंचांगानुसार, कर्क संक्रांती 16 जुलै रोजी आहे. या दिवशी पूजा आणि दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं.
पंचांगानुसार, कर्क संक्रांतीला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करतात अशी मान्यता आहे.
कर्क संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्यदेवाची पूजा केल्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळते आणि तुमचे शरीर निरोगी राहते.
कर्क संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे आणि त्यांना कपडे दान करणे शुभ मानले जाते.
कर्क संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने तुम्हाला विशेष पुण्य प्राप्ती होते.
कर्क संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ वाहत्या पाण्यात टाकावेत आणि या दिवशी काळे तीळही दान करावेत.
कर्क संक्रांतीच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून दान करावा. यामुळे तुमचे पूर्वज तुम्हाला सुखी आणि समृद्ध राहण्यासाठी आशीर्वाद देतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.