GK: शुभकार्यांमध्ये केळीचे खांब वापरण्यामागील महत्त्व काय? जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

केळीचे खांब

लग्नकार्य किंवा सत्यनारायण पूजेसारख्या शुभकार्यात नेहमी केळीचे खांब ठेवले जातात, जे पारंपरिक रितीनुसार शुभतेचे प्रतीक मानले जातात.

शुभकार्य

हिंदू धर्मात श्री गणेशाला आद्यदेव मानून त्याची पूजा केली जाते, जे शुभकार्यास सुरुवात करण्याचे प्रतीक आहे.

गणेशपूजा

कोणतेही शुभकार्य गणेशपूजाशिवाय पूर्ण मानले जात नाही, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय यश मिळणे कठीण मानले जाते.

केळीचे खोड

गणरायाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक रीतीनुसार केळीचे खोड वापरले जाते, जे शुभता आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.

सकारात्मकतेचे प्रतीक

केळीचे खांब शुभतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, ज्याचा वापर धार्मिक आणि पारंपरिक शुभकार्यांमध्ये केला जातो.

शांती आणि समृद्धी

केळीच्या पानांना सुख, शांती आणि समृद्धी आणणारे मानले जाते, त्यामुळे धार्मिक आणि शुभकार्यांमध्ये त्याचा उपयोग केला जातो.

औषधी गुणधर्म

याचे वैज्ञानिक कारण देखील आहे; केळीचे झाड, त्याची पाने आणि फळ औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.

केळीच्या देठाचा रस

पूर्वीच्या काळात विषारी प्राणी चावल्यास केळीच्या देठाचा रस उपचारासाठी वापरला जात असे, ज्याला औषधी गुणधर्म असल्याचे मानले जात असे.

NEXT: गणपती बाप्पाला दहीभात शिदोरी म्हणून का अर्पण करतात? जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा