Dhanshri Shintre
गणपती विसर्जनाच्या दिवशी परंपरेनुसार शिदोरीत दहीभात दिला जातो, जो प्रसादासारखा मानला जातो आणि भक्तांना आवडतो.
दहीभाताची शिदोरी नैवेद्य म्हणून देण्यामागे धार्मिक श्रद्धेसोबतच काही शास्त्रीय कारणेही आहेत, ज्यामुळे ही परंपरा आजही टिकून आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शिदोरी म्हणून दहीभात देणे ही शेकडो वर्षांची परंपरा आहे, जी आजही जपली जाते.
गणेशोत्सवाचा उत्साह, जल्लोष संपल्यानंतर वातावरण शांत करण्यासाठी दहीभात शिदोरी म्हणून दिला जातो, ही परंपरा विशेष महत्त्वाची मानली जाते.
दही शुभ मानले जाते आणि भात समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे दहीभाताचा नैवेद्य मंगल मानला जातो.
अशी मान्यता आहे की दहीभात खाल्ल्याने बाप्पाला आनंद होतो आणि ते पुढच्या वर्षी लवकर परत येतात.
दहा दिवसांच्या उत्साहानंतर विसर्जनाच्या दिवशी साध्या, शुद्ध आणि सात्विक दहीभाताने गणेशोत्सवाचा समारोप केला जातो.