Shreya Maskar
'इक्कीस' 1 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अगस्त्य नंदाने चित्रपटसृष्टीत धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.
'इक्कीस' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात धर्मेंद्र, अगस्त्य नंदा यांच्यासोबत जयदीप अहलावत, आद्यांशी कपूर, एकवली खन्ना, सिमर भाटिया, श्री बिश्नोई, सिकंदर खेर हे कलाकार झळकले आहेत.
'इक्कीस' चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. हे भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान वयाच्या २१ व्या वर्षी शहीद झाले होते.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'इक्कीस' ने चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन तब्बल 10.50 कोटी रुपये झाले आहे. 'इक्कीस' सिनेमा 40-60 कोटींमध्ये तयार झाला आहे.
'इक्कीस' चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी त्याने 70 लाख रुपये मानधन घेतले आहे.
जयदीप अहलावतने आपल्या अभिनयाने त्याच्या भूमिकेला चारचाँद लावले आहेत. ते एक महत्त्वाचे पात्र चित्रपटात साकारतो. यासाठी त्याने 50 लाख रुपये मानधन घेतले आहे.
'इक्कीस' हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी 20 लाख रुपये फी घेतली. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमारची भाची सिमर भाटियाने 'इक्कीस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला या चित्रपटासाठी 5 लाख रुपये मानधन मिळाले.