ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन स्थळासाठी पालघर जिल्ह्याची ओळख आहे
चला तर पालघर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेऊ.
पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असा दाभोस धबधबा आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.
आलेवाडी समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. पावसाळ्यात तुम्ही या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या.
हडाणू बोर्डी समुद्रकिनारा हा त्याच्या स्वच्छ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. दररोज अनेक पर्यटक येथे येत असतात.
केळवा किल्ला हा पालघरमधील केळवा गावाजवळ आहे. १६ व्या शतकात पोर्तुगिंजानी हा किल्ला बांधला होता.
शिरगाव किल्ला हा पालघर तालुक्याच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थित आहे. अनेक पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देत असतात.
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यापैंकी सुरची समुद्रकिनारा आहे. अनेक विदेशी पर्यटक या समुद्रा ठिकाणी येत असतात.