Silent heart attack: अचानक शरीरात हे 7 बदल जाणवले तर समजा हार्ट अटॅक येणारे

Surabhi Jayashree Jagdish

सायलेंट हार्ट अटॅक

सायलेंट हार्ट अटॅक हा सामान्य हार्ट अटॅकसारखाच असतो. यात हृदयाच्या एका भागाकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक कमी होतो किंवा बंद होतो. अनेकांना हार्ट अटॅक आला आहे हेच समजत नाही. यावेळी शरीरात कोणते बदल होतात ते पाहूयात.

Heart attack symptoms | saam tv

छातीत हलका दाब

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये नेहमीप्रमाणे तीव्र छातीत वेदना नाही. त्याऐवजी छातीत जडपणा, दाब आल्यासारखं वाटणं किंवा किरकोळ अस्वस्थता जाणवू शकते. अनेकजण हा त्रास गॅस किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात.

Heart health | saam tv

साधी कामं करतानाही दम लागणं

जिने चढताना, चालताना किंवा रोजची कामं करताना अचानक श्वास लागणं हे महत्त्वाचं लक्षण असू शकतं. पूर्वी सहज होणारी कामं करताना दम लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Fatigue | saam tv

सतत थकवा जाणवणं

पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात ताकद नसल्यासारखं वाटणं किंवा कारण नसताना अनेक दिवस थकवा जाणवत राहणं हेही सायलेंट हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हा थकवा नेहमीच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो.

Neck pain | saam tv

जबडा, मान, खांद्यामध्ये वेदना

हृदयाशी संबंधित त्रास नेहमी छातीतच जाणवेल असं नाही. काही वेळा जबडा, मान, खांदे किंवा पाठीच्या वरच्या भागात दुखणं किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अनेकजण याला मसल पेन समजून दुर्लक्ष करतात

Excessive sweating | saam tv

मळमळ किंवा अपचन

अचानक मळमळणं, पोटात जळजळ होणं किंवा अपचन झाल्यासारखं वाटणं हे देखील सायलेंट हार्ट अटॅकचं संकेत असू शकतं. ही लक्षणं कोणतेही स्पष्ट कारण नसताना दिसत असतील तर काळजी घेतली पाहिजे.

Dizziness | saam tv

कारण नसताना घाम येणं

थंड वातावरणात किंवा कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक भरपूर घाम येणं हे देखील धोक्याचं लक्षण असू शकतं. अशा प्रकारचा घाम इतर लक्षणांसोबत दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Cardiac symptoms | saam tv

चक्कर येणं

अचानक चक्कर येणं, तोल जाण्यासारखं वाटणं किंवा डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं हे देखील सायलेंट हार्ट अटॅकचं संकेत असू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Heart disease | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

Heart Health | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

येथे क्लिक करा