Liver Health: अचानक तुमच्या हातांमध्ये ही 5 लक्षणं दिसली तर समजा लिव्हर खराब होतंय

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर खराब कशामुळे होतं?

अतिप्रमाणात मद्यपान, लठ्ठपणा आणि जास्त चरबीयुक्त आहार ही लिव्हर खराब होण्याची प्रमुख कारणं आहेत. हिपॅटायटिस बी किंवा सी सारखं विषाणूजन्य संसर्गदेखील लिव्हरचं गंभीर नुकसान करू शकतात.

Liver Disease | saam tv

शरीरावर काय परिणाम होतो?

लिव्हर नीट काम न केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे थकवा, भूक न लागणं, वजन कमी होणं आणि कावीळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. गंभीर अवस्थेत पोटात पाणी साचणं, रक्तस्त्राव होणं आणि मेंदूच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.

Fatty Liver | saam tv

तळहात लाल होणं

लिव्हरच्या आजारांमध्ये तळहाताचा मध्यभाग आणि अंगठ्याजवळचा भाग असामान्यपणे लाल दिसू शकतो. याला Palmar Erythema असं म्हणतात. हे विशेषतः दीर्घकालीन लिव्हर आजारांमध्ये दिसणारं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

Palmar Erythema | saam tv

हातांना खाज येणं

लिव्हरचे कार्य बिघडल्यास शरीरात पित्ताचे घटक साचू शकतात. त्यामुळे हातांसह संपूर्ण शरीराला तीव्र खाज सुटू शकते. ही खाज पुरळ नसतानाही सतत जाणवू शकते.

Asterixis | saam tv

बोटांना सूज किंवा क्लबिंग

काही दीर्घकालीन लिव्हर आजारांमध्ये बोटांच्या टोकांचा आकार बदलू शकतो. बोटांच्या टोकांना सूज येऊन ती गोलसर आणि जाड दिसू शकतात. या स्थितीला Finger Clubbing म्हणतात आणि ती इतर आजारांमध्येही आढळू शकते.

Red Palms | saam tv

हात थरथरणं

लिव्हर गंभीरपणे निकामी झाल्यास शरीरात टॉक्सिन द्रव्यं साचून मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हात थरथरण्याचा त्रास होऊ शकतो. या लक्षणाला Asterixis किंवा Liver Flap असं म्हणतात.

Hepatitis B | saam tv

नखांमध्ये बदल

लिव्हरच्या काही आजारांमध्ये नखं पांढरी पडणं, फिकट दिसणं किंवा त्यांचा रंग बदलणं असं दिसू शकतं. काही रुग्णांमध्ये नखांच्या तळाशी गुलाबी रंग कमी होऊन पांढरेपणा वाढलेला दिसतो.

Hepatitis C | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

shortness of breath symptoms | saam tv
येथे क्लिक करा