Fluid retention: पायांमध्ये अचानक ही 4 लक्षणं दिसली तर समजा शरीरात पाणी जमा होतंय

Surabhi Jayashree Jagdish

शरीरात पाणी जमा होणं

शरीरातील रक्तवाहिन्यांमधून काही प्रमाणात द्रव बाहेर पडून ऊतींमध्ये साचल्यास त्याला एडिमा (Edema) म्हणतात. सामान्यतः हा द्रव पुन्हा रक्ताभिसरण किंवा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये परत जातो. पण ही प्रक्रिया बिघडल्यास सूज निर्माण होते.

Swollen feet | saam tv

शरीरात पाणी का जमा होतं?

हृदय, किडनी किंवा यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरात द्रव साचू शकतो. जास्त मीठाचं सेवन, काही औषधं, हार्मोन्समधील बदल ही यामागील कारणं असू शकतात. काही वेळा गर्भधारणा, दीर्घकाळ बसून किंवा उभं राहणं यामुळेही तात्पुरती सूज येऊ शकते.

Swollen ankles | saam tv

ही परिस्थिती केव्हा उद्भवते?

दीर्घकाळ एका जागी बसणं किंवा उभं राहणं यामुळे पायांमध्ये द्रव साचण्याची शक्यता वाढते. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, यकृताचे विकार किंवा शिरांमधील रक्तप्रवाह कमी झाल्यास ही समस्या अधिक दिसून येते.

Leg swelling | saam tv

पायांमध्ये सूज

घोटे, तळपाय किंवा पोटऱ्यांमध्ये स्पष्ट सूज दिसू लागते. बूट किंवा चप्पल नेहमीपेक्षा घट्ट वाटू लागतात. दिवसाच्या शेवटी किंवा जास्त वेळ उभं राहिल्यानंतर ही सूज अधिक वाढलेली जाणवू शकते.

Pitting edema | saam tv

त्वचेवर दाब दिल्यावर खड्डा पडतो

सुजलेल्या भागावर बोटाने काही सेकंद दाब दिल्यास हलका भाग आत गेल्यासारखा वाटतो. याला पिटिंग एडिमा (Pitting Edema) असं म्हणतात. हे शरीरात द्रव साचल्याचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

Water retention | saam tv

पाय जड वाटणं

पाय सतत जड वाटू शकतात. चालताना किंवा जिने चढताना पायांमध्ये अस्वस्थता अधिक जाणवू शकते. जर हा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे नक्की जा.

Edema symptoms | saam tv

पाय दुखणं

सूज वाढल्यास पायांमध्ये वेदना जाणवू शकतात. घोटा वाकवताना किंवा चालताना हालचालींमध्ये अडथळा जाणवू शकतो. जर सूजेसोबत लालसरपणा, तीव्र वेदना, श्वास लागणे किंवा अचानक एका पायातच सूज आली तर तातडीने वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.

Causes of edema | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Chia seeds: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी कधी खावेत चिया सिड्स?

Chia seeds | saam tv
येथे क्लिक करा