Surabhi Jayashree Jagdish
भारतीय लोक दिवसभरात साखरेचं सेवन करतात. चहा, मिठाई, चॉकलेट आणि कँडी यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त अस रोजच्या जीवनात समावेश असतो. चहा आणि कॉफीही बहुतांश लोक साखरेशिवाय पित नाहीत.
भारतातील कॅन्सर हीलर सेंटरचे ऑन्कोलॉजिस्ट आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये . त्यात त्यांनी म्हटलंय की, २१ दिवस साखर सोडल्यास तुमचं आयुष्य बदलून जाईल. हा बदल आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
डॉ. तरंग यांच्या मते, आपल्या शरीरात सूज येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे साखर आहे. साखरेचं सेवन केल्यामुळे शरीरात सूज येण्याचं प्रमाण वाढतं.
साखर ही फक्त डायबिटीज किंवा इन्फ्लेमेशनचं कारण नसून कॅन्सरचा धोका वाढण्याचंही सर्वात मोठं कारण आहे. साखरेमुळे पेशींची वाढ असामान्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
कॅन्सर असो वा नसो, पण जर तुम्ही साखर घेत असाल तर तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतायत. इम्यून सिस्टम कमजोर झाल्यास शरीर अनेक आजारांना बळी पडतं. त्यामुळे साखर टाळणं आवश्यक आहे.
कॅन्सर तज्ज्ञांच्या मते, साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता. यामुळे शरीराला नैसर्गिक गोडवा मिळतो. तसेच जीवनशैली आपोआप आरोग्यदायी बनते.
आइसक्रीम, चॉकलेट आणि कँडी यांसारख्या पदार्थांमध्ये साखर असते. ही साखर शरीरासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
जर तुम्ही २१ दिवसांसाठी साखर सोडली तर शरीरातील इन्फ्लामेशन कमी होऊ लागते. रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. याशिवाय शरीरातील इतर समस्या देखील कमी होऊ लागतात.