Skipping Breakfast: १ महिना नाश्ता टाळला तर..., होतील हे धोकादायक परिणाम, वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

रोजची सवय

बहुतेक लोकांचा दिवस गरम चहा आणि हलक्याफुलक्या नाश्त्याने सुरू होतो, ही त्यांची रोजची सवय असते.

पोषक नाश्ता

दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि पोषक नाश्त्याने झाली तर कामात ऊर्जा आणि एकाग्रता दिवसभर टिकून राहते.

आरोग्यावर वाईट परिणाम

खूप लोक सकाळचा नाश्ता चुकवतात, ही सवय कायम राहिल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊन आजार वाढू शकतात.

नैराश्याची शक्यता

एका महिन्यासाठी नाश्ता न केल्यास सेरोटोनिन घटते, त्यामुळे चिडचिड, चिंता आणि नैराश्याची शक्यता वाढते.

वजन वाढतं

सकाळचा नाश्ता न केल्याने वजन कमी न होता उलट वाढू शकतं, कारण नंतरच्या जेवणात अति खाल्ल्याने कॅलोरी जास्त घेतली जाते.

मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका

नाश्ता न करणं ही सवय मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढवते, त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि टाइप २ डायबिटीस होण्याची शक्यता जास्त होते.

मधुमेहाचा धोका

नाश्ता न करणाऱ्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका अधिक असतो, म्हणून हृदयासाठी दररोज नाश्ता करणे आवश्यक आहे.

टाइप २ डायबिटीसचा धोका

सकाळचा नाश्ता नियमित न केल्यास टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो, कारण रक्तातील साखर नियंत्रण बिघडते आणि आजाराची शक्यता वाढते.

NEXT: थकवा, आळस दूर करायचाय? रोज सकाळी 'हे' सुपरफूड शेक पिल्याने मिळेल मानसिक ऊर्जा

येथे क्लिक करा