Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Surabhi Jayashree Jagdish

कोलन कॅन्सर

जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी कोलन कॅन्सर एक आहे. हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात शांतपणे वाढतो आणि त्याची लक्षणे फारशी दिसून येत नाहीत. त्यामुळे वेळेत निदान होणे कठीण ठरते.

लक्षणं

काही ठळक लक्षणं अशी आहेत जी दिसल्यास तात्काळ तपासणी करणं आवश्यक आहे. ही लक्षणे ओळखल्यास योग्य वेळी उपचार सुरू करता येतात आणि गंभीर गुंतागुंती टाळता येतात.

पोटदुखी

पोटात सतत वेदना, फुगणं किंवा खालच्या पोटात वेदना जाणवणं हे कोलनमध्ये अडथळा किंवा गाठ वाढल्याचे संकेत असू शकतात.

शौचात रक्त दिसणं

शौचात तेजस्वी लालसर किंवा काळसर रक्त दिसणे हे कोलनमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षण आहे. हे कोलन कॅन्सरचे सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे संकेत मानले जातात.

थकवा आणि अशक्तपणा

सतत थकवा जाणवणं आणि विश्रांती घेतल्यानंतरही ऊर्जा न मिळणं हे आतल्या रक्तस्त्रावामुळे किंवा कॅन्सरमुळे झालेल्या अ‍ॅनिमियाचे लक्षण असू शकतं.

अपूर्ण शौचाची भावना

शौचालयात गेल्यानंतरही पोट पूर्ण रिकामं झालं नाही असं वाटणं ही कोलनमध्ये अडथळा निर्माण झाल्याची सुरुवातीची खूण असू शकते.

शौचाच्या सवयींमध्ये बदल

वारंवार बद्धकोष्ठता, जुलाब किंवा शौचाच्या स्वरूपात अचानक बदल होणं आणि ते काही आठवडे टिकणं हे कोलन कॅन्सरचं संकेत असू शकतात.

वजन कमी होणं

आहार किंवा शारीरिक क्रियेत बदल न करता अचानक वजन कमी होणं हे शरीर आतल्या गंभीर आजाराशी लढत असल्याचं लक्षण असू शकतं.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांमध्ये कच्च्या कांद्याची फोडणी देऊ नये? भाजीची चव बिघडेल

Cooking Tips No Onion | saam tv
येथे क्लिक करा