Silent heart attack: शरीरात ही ५ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅकचा आहे धोका

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक

आजकाल हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होतेय. केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.

Heart attack symptoms

संकेत

मात्र अशी काही लक्षणं आहेत जी तुमचं हार्ट धोक्यात असल्याचं सांगतात. अनेकदा ही लक्षणं दिसून देखील आपण दुर्लक्ष करतो. शरीर आपल्याला कोणते संकेत देत असतं ते पाहूयात.

Silent heart attack

जबडा किंवा दातांमध्ये वेदना

काही वेळा हृदयाच्या त्रासाचं पहिलं लक्षणं हे जबडा किंवा दातांमध्ये जाणवणारी वेदना असू शकतो. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण अधिक दिसतं. ही वेदना अनेकदा दातांचा त्रास समजून दुर्लक्षित केली जाते.

Chest pain

पायांमध्ये सूज येणं

हृदय नीट काम करत नसेल तर शरीरात द्रव साचायला लागतो. यामुळे पायांमध्ये सूज दिसून येते. ही सूज विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री जास्त वाढते. ही स्थिती हार्ट फेल्युअरचं महत्त्वाचं लक्षण असू शकते.

Jaw pain

झोपताना श्वास घेण्यास त्रास होणं

झोपताना श्वास घेणं कठीण जात असेल तर हे देखील धोक्याचं ठरू शकतं. याला वैद्यकीय भाषेत ऑर्थोप्निया म्हणतात. हे सहसा कंजेस्टिव हार्ट फेल्युअरमध्ये दिसून येतं.

Shortness of breath

मळमळ आणि थंड घाम येणं

काही लोकांना अचानक मळमळ, थंड घाम आणि अशक्तपणा जाणवतो. हे विशेषतः सायलेंट हार्ट अटॅकमध्ये दिसतं. जो महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. यासोबत चक्कर येणं, थकवा किंवा चिंता जाणवू शकते.

Heart failure signs

लैंगिक समस्या ठेवण्यात अडथळा

पुरुषांमध्ये दिसणारी इरेक्टाइल डिसफंक्शन हा देखील हार्ट अटॅकचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. कारण लहान रक्तवाहिन्यांमध्ये होणारा त्रास मोठ्या हृदयवाहिन्यांपेक्षा आधी दिसून येतो.

Cold sweat

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

maratha king beard tradition explanation
येथे क्लिक करा